आशिष शेलार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला?

Update: 2022-08-12 15:16 GMT

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजपमध्येही संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या जागेवर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मंगलप्रभात लोढा यांच्या जागी आशिष शेलार यांची मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आशिष शेलार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक वक्तव्ये केल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन करताना आशिष शेलार यांनी बावनकुळे यांच्यावर अन्याय झाला तरी त्यांनी पक्ष सर्वतोपरी ही भूमिका ठेवल्याचे म्हटले आहे. यावेळी आशिष शेलार यांचा रोख कुणाकडे होता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्या सरकारमध्ये ऊर्जामंत्री होते. पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटच नाकारण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनीच बावनकुळे यांचे तिकीट कापले अशी चर्चा तेव्हापासून होते आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमून वरिष्ठांनी फडणवीस यांना धक्का दिला आहे का, अशी चर्चा आहे. त्यामउळे आशिष शेलार यांनी बावनकुळे यांच्यावर अन्याय झाल्याचे वक्तव्य केल्याने तो फडणवीस यांना टोला आहे का, अशीही चर्चा आहे.

Tags:    

Similar News