#EknathShinde : शिंदे गटासाठी मुंबई महत्त्वाची नाही का?

Update: 2022-08-09 07:05 GMT

उद्धव ठाकरे यांनी संकटात टाकलेल्या शिवसेनेला वाचवायचे आहे असे सांगत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यानंतर सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिवसेना नव्या ताकदीने उभी करु आणि पक्ष वाढवू असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला मुंबईचे महत्त्व नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक आता जवळ येत आहे, शिवसेनेची सगळ्यात जास्त ताकद ही मुंबईत आहे. त्यामुळे शिंदे गटाला आणि भाजपला शह द्यायचा असेल तर मुंबईवर आपली पकड असली पाहिजे हे उद्धव ठाकरे जाणून आहेत. पण मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या गटातील मुंबईच्या पाचपैकी एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. पण तिकडे भाजपने मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात स्थान देत मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

शिंदे गटातील मुंबईचे आमदार

मंगेश कुडाळकर

सदा सरवणकर

यामिनी जाधव




 



दिलीप लांडे

प्रकाश सुर्वे





 


शिवसेनेसाठी मुंबई किती महत्त्वाची हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मूळ शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईतील किमान एका तरी आमदाराला मंत्रीपद का दिले नाही, असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.

Tags:    

Similar News