केंद्रात नितीन गडकरी यांना मोठा झटका, तर देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री...

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा मराठमोळ्या नितीन गडकरींना धक्का

Update: 2022-08-17 09:27 GMT

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी संसदीय बोर्डाची नव्याने घोषणा केली आहे. या बोर्डाला पक्षाबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार असतात. त्या बोर्डातून नितीन गडकरी यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची नाव वगळण्यात आलं आहे. या समितीत आता एकही मराठी माणूस नाही. भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, निवडणूकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उत्तर प्रदेशमधून मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचंही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही.

विशेष बाब म्हणजे भाजपमध्ये 75 वर्ष वय असलेल्या नेत्यांना मोठी पद दिली जात नाही. मात्र, 77 वय असलेल्या येडियुरप्पा यांना पक्षाच्या बोर्ड समितीत स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या संसदीय समितीतील नावं पुढील प्रमाणे...

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)

नरेंद्र मोदी

राजनाथ सिंह

अमित भाई शाह

बी. एस. येदयुरप्पा

सर्बानंद सोनोवाल

के. लक्ष्मण

इकबाल सिंह लालपुरा

सुधा यादव

सत्यनारायण जटिया

बी एल संतोष (सचिव)

यासोबतच भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी केंद्रीय निवडणूक समितीच्या १५ सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती स्थापन केली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे.

त्याचे सदस्य खालील प्रमाणे..

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)

नरेंद्र मोदी

राजनाथ सिंह

अमित भाई शाह

बी. एस. येदयुरप्पा

सर्बानंद सोनोवाल

के. लक्ष्मण

इकबाल सिंह लालपुरा

सुधा यादव

सत्यनारायण जटिया

भूपेन्द्र यादव

देवेन्द्र फडणवीस

ओम माथुर

बीएल संतोष (सचिव)

वनथी श्रीनिवास

Tags:    

Similar News