हे सरकार उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल -  मंदा म्हात्रे

Update: 2022-07-03 12:08 GMT

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर विशेष अधिवेशनाचे  आयोजन करण्यात आले. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान सभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार ॲड. राहुल नार्वेकर हे बहुमताने विजयी झाले. त्यांच्या समोर  महविकास आघाडी विरोधात शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राहुल नार्वेकर विजयी झाल्यानंतर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आनंद व्यक्त करत हे सरकार पुढील अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल असा विश्वास देखील व्यक्त केला.

Full View
Tags:    

Similar News