अहमदनगरच्या नामांतराची मागणी, पडळकर आणि मिटकरींमध्ये खडाजंगी

Update: 2022-06-02 14:08 GMT

औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून नामांतर करण्याचं आवाहन केलं आहे. पडळकर यांनी पत्रातून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दुसरीकडे या पत्रावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचा नाव न घेता तोंडसुख घेतले आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गुरुवारी ते खामगावात आले आले होते. "नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॅाम्बब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो" या शब्दात पडळकरांनी टीका केली होती.

यानंतर पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राजमाता अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. याच पत्रावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे. फडणवीसांना खूष करण्यासाठी काही लोकांनी सामाजिक राजकारण बिघडविण्याची सुपारी घेतली" असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

Full View

Tags:    

Similar News