कालिया अब तेरा क्या होगा? किरीट सोमय्या यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल

Update: 2022-06-05 11:35 GMT

सचिन वाझे शंभर कोटी वसूली प्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याने शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार होण्यास मान्यता दिली. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

किरीट सोमय्या म्हणाले की, सचिन वाझेला माफीचा साक्षीदार होण्यास सीबीआयने मंजूरी दिली आहे. त्यामुळे सचिन वाझे याच्या माध्यमातून अनिल परब याच्या दापोली येथील रिसॉर्टच्या काँट्रॅक्टरला पैसे दिले असल्याचे वाझेनी सांगितले तर अनिल परब यांचे काय होईल? अशी भीती उध्दव ठाकरे यांना वाटत असल्याचा टोला सोमय्या यांनी लगावला.

सोमय्या पुढे म्हणाले, अनिल परब यांनी दापोली येथील रिसॉर्ट स्वतःचे असल्याचे इनकम टॅक्स विभागाला सांगितले आहे. ग्रामपंचायतीला सांगितले. तर या रिसॉर्टच्या बांधकामासाठी 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार होता. मात्र त्यापैकी 15 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पण हा पैसा अनिल परब यांच्या खात्यातून ट्रान्सफर झाला नसल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे तेरा क्या होगा कालिया? अशी भीती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वाटत असल्याचा टोला सोमय्या यांनी लगावला.

सचिन वाझे सीबीआयच्या माफीचा साक्षीदार झाला आहे. तसेच अनिल परब यांचा वाझे म्हणजेच बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षीदार झाला तर अनिल परब यांची पोलखोल होईल, असे सोमय्या यावेळी म्हणाले. आमदारांना घोडे म्हणण्याचं पाप गाढवचं करू शकतात. संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपकडून घोडेबाजार होणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून किरीट सोमय्या म्हणाले की, राज्याच्या पोलिस महासंचालकांना विनंती आहे की, सामनाचे संपादक आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून कोण घोडेबाजार करणार आहे त्याची माहिती घ्यावी. याबरोबरच किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जबाबदारी आहे की, त्यांच्या वर्तमान पत्रात आलेली माहिती त्यांनी निवडणूक आयोग आणि पोलिस यांना का दिली नाही? जर त्यामध्ये तथ्य असेल तर घोडेबाजार करणारांवर कारवाई करावी. भाजप अशा प्रकारे भ्रष्टाचार सहन करणार नाही.

पोलिस महासंचालकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सामनाचे संपादक यांचे स्टेटमेंट घ्यावे. कारण बेईमान कोण? सेनेचे आमदार, त्यांना समर्थन देणारे आमदार की नेते याचा खुलासा व्हावा. कारण आमदारांना घोडे म्हणण्याचे पाप गाढवच करू शकतात, असा टोलाही यावेळी सोमय्या यांनी लगावला.

Tags:    

Similar News