केंद्रीय मंत्र्यांची अटक म्हणजे सुडाचे राजकारण - पाटील

Update: 2021-08-24 04:35 GMT

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाल्याचे वृत्त येताच भाजपचे चांगलंच आक्रमक झालं आहे, "भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची बोलण्याची एक स्टाईल आहे. एखाद्या वाक्यावरुन थेट केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? म्हणजे सुडाचे राजकारण असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

सोबतच अनेक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावर हे सरकार का कारवाई करत नाही ? ही अटक सुडापोटी सुरू आहे. त्यावरुन पुढे जे काय होईल त्याला सत्ताधारी जबाबदार असतील अशा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग करणं योग्य नाही. नारायण राणेंची यांची बोलण्याची एक शैली आहे.प्रत्येकाची एक बोलण्याची स्टाईल असते, त्यात व्यक्तिगत असूया नसते.असही पाटील म्हणाले. एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असू शकते. अस पाटील यांनी म्हटले आहे. सोबतच राणे 'मारतो' म्हणाले नाहीत, 'मारणार आहे' ही धमकी असते, न्यायालयात ही गोष्ट टिकणारच नाही. सोबतच ते, 'मी असतो तर' असं म्हणाले आहेत असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Tags:    

Similar News