धुळे महापालिकेत महापौरपदी भाजपचे प्रदीप कर्पे, शिवसेना तटस्थ

Update: 2021-09-17 13:22 GMT

सांगली आणि जळगावमध्ये भाजपकडे बहुमत असूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने करेक्ट कार्यक्रम करत आपापली सत्ता स्थापन केली होती. सांगलीमध्ये राष्ट्रवादी आणि जळगावमध्ये शिवसेनेने आपला महापौर केला. त्यानंतर धुळ्यातही भाजपचा कार्यक्रम होतो का अशी चर्चा होती. पण महापौर पदाच्या निवडणुकीत भापने सावध पावलं टाकत करेक्ट कार्यक्रम केला आहे, धुळे महापालिका महापौर पदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रदीप कर्पे यांचा विजय झाला आहे. भाजपच्या सर्वच्या सर्व 50 नगरसेवकांनी कर्फे यांना मतदान केलं. काँग्रेसच्या उमेदवाराला 17 मतं पडली, तर या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली. महाविकास आघाडी विखुरलेली असल्याने भाजपचा महापौरपदाचा मार्ग सुकर झाला.

भाजपने आपले सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना केले होते. तसेच धुळ्यात महाविकास आघाडीत एकवाक्यता दिसली नाही. यामुळे आघाडीच्या करेक्ट कार्यक्रमाच्याम मालिकेला भाजपने छेद दिला आणि आपला महापौर पुन्हा बसवण्यात यश मिळवलं, असे बोलले जात आहे.

धुळ्याचे महापौरपद भाजपकडे

एकूण नगरसेवक – 74

बहुमताचा आकडा - 38

प्रदीप कर्पे - भाजप ( विजयी) - 50 मते

मदिना शेख - काँग्रेस- 17 मते

अन्सारी सईदा इकबाल - एमआयएम - 04

शिवसेना - 02 तटस्थ

Tags:    

Similar News