महाराष्ट्रातील पूर परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार- बावनकुळे

कोकणातील पुराच्या परिस्थितीला ही राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असतानाच धरणांतून विसर्ग सुरू केला असता तर कोकणला पुराचा फटका बसला नसता मात्र राज्य सरकारमध्ये नियोजनाचा अभाव आहे असं बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Update: 2021-07-26 04:00 GMT

औरंगाबाद// कोकणातील पुराच्या परिस्थितीला ही राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते औरंगाबादच्या बजाज नगर परिसरात महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असतानाच धरणांतून विसर्ग सुरू केला असता तर कोकणला पुराचा फटका बसला नसता मात्र राज्य सरकारकडे नियोजनाचा अभाव असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे टीका माजी मंत्री बावनकुळे यांनी केली.

मुख्यमंत्री मुंबईत, तर उपमुख्यमंत्री बारामतीत

दरम्यान यावेळी बोलताना बावनकुळे यांनी म्हंटले आहे की, अजूनही कोकणातील पूरग्रस्तांना पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळालेली नाही. तिथल्या ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. असं असताना मुख्यमंत्री मुंबईत तर उपमुख्यमंत्री बारामतीत अशीच काहीशी परिस्थिती आहे असं बावनकुळे म्हणालेत.

एकीकडे पूर तर दुसरीकडे दुष्काळ

एकीकडे कोकणात पुराने माणसं मरता आहेत तर उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बी -बियाणे, खते वेळेवर मिळत नाही मात्र राज्य सरकारला याचे कोणतेच गांभीर्य दिसत नाही अशी टीका बावनकुळे यांनी केली.

ओबीसी आरक्षण हे ठाकरे सरकारमुळे गेले

सोबतच ओबीसी आरक्षण हे ठाकरे सरकारमुळेच गेल्याचे म्हणत ही राज्य सरकारची जबाबदार आहे असं त्यांनी म्हंटले आहे. दोन महिन्यात आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर राज्य सरकार मधील मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

Tags:    

Similar News