संजय राऊत अटकेत, बाळासाहेब ठाकरेंच्या ड्रायव्हरने वाटले पेढे

Update: 2022-08-02 10:13 GMT

संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. पण आता एकेकाळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ड्रायव्हर म्हणून काम करमारा शिवसैनिक प्रकाश राजपूत यांनी मात्र या अटकेचे स्वागत करत पेढे वाढले आहे. संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे एकेकाळी ड्रायव्हर असल्याचे सांगणारे प्रकाश राजपूत यांनी पेढे वाटले आहेत. राजपूत हे खास धुळ्यातून दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे देण्यासाठी आले होते. संजय राऊत यांनी शिवसेना संपवली, खूप चुकीची कामं केली असा आरोप त्यांनी केला आहे. राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी आपल्याला कामावरुन काढले होते, १९९३ ते २००० या काळात आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर होतो, असेही त्यांनी सांगितले.

Tags:    

Similar News