जो भाजप सोडतो, त्याची दुर्गतीच होते; एकनाथ खडसेंच्या होमपीचवर आशिष शेलारांची बॅटींग

जो भाजप सोडतो, त्याची दुर्गतीच होते; एकनाथ खडसेंच्या होमपीचवर आशिष शेलारांची बॅटींग

Update: 2021-08-04 14:17 GMT

भाजप सोडून राष्ट्रवादी वासी झालेले एकनाथ खडसे यांचा विषय जुना झाला आहे. त्‍यांच्‍यावर बोलणार नाही. मात्र, ज्यांनी भाजप सोडली. त्यांची दुर्गतीच झाली आहे. मोठं झाड कोसळले तर काही काळ पडझड होते. मात्र, येत्या निवडणुकांमध्ये 'दूध का दूध पानी का पानी' होणार असल्याचे सांगत आमदार आशिष शेलार यांनी खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आशिष शेलार यांनी खडसे यांना टोला लगावला आहे.

आशिष शेलार गेल्या तीन दिवसांपासून खान्देश दौऱ्यावर आहेत. नंदुरबार धुळे आणि आज जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले असतांना आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे सरकार वर जोरदार टीका केली.

मृतांचे आकडे जाहीर करणारे ठाकरे सरकार

सरकारी यंत्रणेने सातत्याने आकडे लपवले आहेत. कोरोनाच्‍या काळात खूप आकडे लपविले गेले आहेत. कोकणातील पुरग्रस्‍तांच्‍या बाबतीत देखील असेच झाले आहे. म्‍हणून माणसांना वाचविणारे सरकार नसून मृतांचे आकडे जाहीर करणारे सरकार असल्‍याची टीका देखील शेलार यांनी केली.

राज्‍याचे परिवहन मंत्री असलेले अनिल परब हे परिवार मंत्री आहे. ते एकाच परिवाराची सेवा करत असल्याची टीका शेलार यांनी केली. कर्मचाऱ्यांनी पुरात देखील काम केले. हे दुःख राज्‍य सरकार पाहतेय असे होत नाही. जुन्‍या बस चालविल्‍या जाताय, पगार वेळेवर होत नाही. असा महामंडळांचा भोंगळ कारभार सुरू आहे.

आमदार गिरीश महाजन यांना नाशिक तसेच स्थानिक कार्यक्रमात डावलले जात असल्‍याच्या चर्चेच्या मुद्यावर बोलताना आमदार शेलार म्हणाले, की आमदार महाजन यांना बाजूला करण्याचा कोणताही विचार पक्षाचा नाही. कोकणातील पूरग्रस्त परिस्थितीत ते मदतीला धावून गेले राज्याचे आणि स्थानिक नेतृत्व बदलणार नसल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News