लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी केंद्रीय मंत्री पुत्राला जामीन मंजूर

Update: 2022-02-10 08:55 GMT

उत्तर प्रदेशातील शेतकरी प्रभावीत भागात विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत असताना लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील केंद्रीय राज्यमंत्री (गृह) अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा य अलाहाबाद उच्च न्यायालयाने लखीमपूर खेरी घटनेत जामीन मंजूर केला आहेय.

चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झालेल्या लखीमपुर खेरी घटनेनंतर देशव्यापी संताप झाला होता. आज पहिल्या टप्प्यात 58 मतदारसंघांमध्ये सात टप्प्यातील यूपी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे.

18 जानेवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मिश्रा यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पूर्ण केल्यानंतर मिश्रा यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.

मिश्रा यांच्या वतीने हजर झालेल्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांचा अशिला निर्दोष आहे आणि त्यांनी वाहन चालकाला शेतकर्‍यांना चिरडण्यासाठी भडकावल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याविरुद्ध नाही. याचिकेला विरोध करताना, अतिरिक्त महाधिवक्ता व्ही के शाही म्हणाले की, घटनेच्या वेळी मिश्रा कारमध्ये होते ज्याने शेतकऱ्यांना चाकाखाली चिरडले.

Tags:    

Similar News