'माझा फोन टॅप झाला, अमित शहा राजीनामा द्या': राहुल गांधी आक्रमक

Update: 2021-07-23 08:17 GMT

Pegasus Spy case संदर्भात माजी अध्‍यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात Pegasus स्पायवेअर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सोमवार 26 जुलै पर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. आज राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

माझा फोन टॅप केला होता, मी संभावीत टारगेट नाही. फक्त माझा फोन नाही तर माझे इतरही फोन टॅप केले जात आहेत. हा माझ्या खाजगी आयुष्याचं प्रकरण नाही. मी जनतेचा आवाज उठवतो. नरेंद्र मोदी यांनी Pegasus Spy चा वापर जनतेच्या विरोधात केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा. पंतप्रधान आणि गृह मंत्रालयाशिवाय याची परवानगी देऊ शकत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी केली पाहिजे.

इस्त्राइल सरकारने पेगासस हे हेरगिरीचं एक हत्यार म्हणून तयार केलं आहे. मात्र, आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृह मंत्री हे लोकशाही विरोधात वापरत आहेत. हे जनतेच्या आवाजावर केलेलं आक्रमण आहे.

प्रश्न हा नाही अनिल अंबानी यांचा फोन टॅप झाला. प्रश्न आहे. अनिल सीबीआय एफआईआर करणार तोच CBI च्या अधिकाऱ्याचा फोन टॅप करुन त्यांना ब्लॅकमेल केलं गेले. द वायरसह जगभरातील 16 वृत्तमाध्यमांनी Pegasus स्पायवेअरच्या माध्यमातून काही जणांवर पाळत ठेवली गेली होती, असा गौप्यस्फोट केला आहे. या वृत्तानुसार Pegasus स्पायवेअरचा वापर करून भारतातील काही राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, न्यायालयीन अधिकारी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.

यामध्ये राहुल गांधी, भाजपचे विद्यमान माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवर पळत ठेवली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली आहे.

Tags:    

Similar News