पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील

Update: 2025-09-04 13:08 GMT

मुंबई, दि. 03 : पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 5 हजार 100 कोटी रुपये असून त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. यातील 50:50 टक्के आर्थिक सहभागाची जबाबदारी केंद्र सरकार व राज्य शासन उचलणार आहेत. राज्य शासनाचा एकूण वाटा 2 हजार 550 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या हिस्स्यातील या 2 हजार 550 कोटींपैकी पुणे महानगरपालिका (20%) 510 कोटी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (20%) : 510 कोटी, पीएमआरडीए (30%) 765 कोटी असा स्थानिक संस्थांचा सहभाग राहणार असून उर्वरित रक्कम राज्य शासन देणार आहे. या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच, पुणे-मुंबई या दोन महानगरांतील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

भारताच्या सेवाक्षेत्रात विक्रमी वाढ, ऑगस्टमध्ये १५ वर्षांचा उच्चांक

भारताच्या सेवाक्षेत्राने ऑगस्ट महिन्यात दमदार कामगिरी करत १५ वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. HSBC इंडिया सर्व्हिसेस PMI बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्स जुलैतील ६०.५ अंकांवरून ऑगस्टमध्ये ६२.९ अंकांवर गेला. जून २०१० नंतरचा हा सर्वात वेगवान वाढ दर आहे.

PMI इंडेक्सनुसार ५० पेक्षा जास्त गुण म्हणजे वाढ आणि ५० च्या खाली गुण म्हणजे घसरण दर्शवतात.

आंतरराष्ट्रीय विक्रीत लक्षणीय तेजी

ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय विक्रीतही उल्लेखनीय वाढ झाली. सप्टेंबर २०१४ नंतरची ही तिसरी सर्वात मोठी वाढ मानली जाते. विदेशी ग्राहकांकडून आलेल्या नव्या ऑर्डर्समुळे मागणीत मोठी उसळी दिसली. यामुळे भारतीय कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढवली आणि नव्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली.

इनपुट आणि आउटपुट खर्च वाढले

ऑगस्ट महिन्यात इनपुट आणि आउटपुट किंमतींमध्ये वाढ नोंदली गेली. मजुरी आणि मजुरीशी संबंधित खर्च वाढल्यामुळे कंपन्यांनी ग्राहकांकडून आकारले जाणारे दरही वाढवले. हे दर जुलै २०१२ नंतरचे सर्वाधिक आहेत.

उत्पादन क्षेत्रातही तेजी

केवळ सेवाक्षेत्रच नव्हे तर उत्पादन क्षेत्रानेही दमदार कामगिरी केली. HSBC इंडिया कॉम्पोजिट PMI आउटपुट इंडेक्स जुलैतील ६१.१ वरून ऑगस्टमध्ये ६३.२ अंकांवर पोहोचला. हा मागील १७ वर्षांतील सर्वाधिक वेगवान वाढ दर आहे.

कंपन्यांचा भविष्यासंबंधी सकारात्मक दृष्टिकोन

सर्वेक्षणानुसार, कंपन्यांच्या भविष्यासंबंधी अपेक्षा पाच महिन्यांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत. वाढती मागणी आणि नव्या भरतीच्या आधारावर कंपन्यांना खात्री आहे की पुढील काही महिन्यांतही व्यवसायाची गती मजबूत राहील.

Tags:    

Similar News