जनहित याचिकेतून मनोहर भिडेचे नाव वगळा, उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना सूचना

Update: 2023-08-07 08:47 GMT

मनोहर भिडे याने महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात कुमार सप्तर्षी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी मनोहर भिडेचे नाव जनहित याचिकेतून वगळण्याची सूचना केली.

मनोहर भिडे याने महात्मा गांधी यांच्या आईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याबरोबरच महात्मा फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

महात्मा गांधींसह महान व्यक्तींबाबत बदनामीकारक विधानं वाढल्याविरोधात ज्येष्ठ गांधीवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामध्ये अब्रुनुकसानी, मानहानीशी संबंधित भारतीय दंड संहितेतील मुलभूत अधिकारांशी संबंधित घटनेतील अनुच्छेद 14 आणि 21चं उल्लंघन करणार्‍या भादंविचं कलम 499 आणि 500 रद्द करण्याचीही मागणी याचिकेत करण्यात आली होती. यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी मनोहर भिडेंचं नाव याचिकेतून वगळण्याची सूचना याचिकाकर्त्यांना केली होती.

अनेक प्रकरण असताना केवळ संभाजी भिडेंविरोधातच याचिका का? असा सवाल करत जनहित याचिका केवळ एका व्यक्तीविरोधात होऊ शकत नाही, असंही उच्च न्यायालयाने म्हंटले.

त्यावर हायकोर्टानं योग्य ते निर्देश द्यावेत. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचं की नाही याचा निर्णय घेऊ, असं म्हणत मनोहर भिडे याचे नाव कायम ठेवण्यावर ठाम असल्याचे सांगितले.

Tags:    

Similar News