Pegasus हेरगिरीचा पर्दाफाश करणाऱ्या द वायरच्या ऑफिसमध्ये दिल्ली पोलीस

Update: 2021-07-24 02:20 GMT

Pegasus Spyware द्वारे राजकारणी, नोकरशाहा, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवली गेली होती, असा गौप्यस्फोट द वायर सह जगभरातील 16 माध्यमांनी केला. भारतात संसद अधिवेशऩाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्याने केंद्र सरकारची कोंडी झाली आहे. ज्या कंपनीने Pegasus Spyware ची निर्मिती केली आहे, त्या कंपनीने आपण केवळ देशांच्या सरकारांचे कंत्राट घेतो असे स्पष्ट केल्याने मोदी सरकार संशयाच्या घेऱ्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे केंद्र सरकारची कोंडी झाली आअहे. या पार्श्वभूमीवर हे वृत्त देणाऱ्या द वायर या वेबपोर्टलच्या कार्यालयात शुक्रवारी दिल्ली पोलीस दाखल झाले. यासंदर्भात द वायरचे सिद्धार्थ वरदराजन यांनी ट्विट करुन याची माहिती दिली की, "दिल्ली पोलिसांची टीम ऑफिसमध्ये आली आणि आमच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करायला सुरूवात केली. विनोद दुवा कोण आहे, स्वरा भास्कर कोण आहे, तुमचे रेंट एग्रीमेंट कुठे आहे, आम्ही अरफाशी बोलू शकतो का?" असे सवाल पोलिसांनी केल्याची माहिती वरदराजन यांनी दिली आहे.



              


  या भागाचे डीसीपी दीपक यादव यांनी मात्र 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर रुटीन तपासणी असल्याचे सांगितले आहे. तसेच वरदराजन यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आणि दहशतवादी कारवायांची शक्यता असल्याने आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. यामध्ये भाडेकरुंची चौकशी, गेस्ट हाऊसची तपासणी यासारखी कारवाई सुरू असते. बाहेर कोणता बोर्ड नसल्याने आमची कर्मचाऱ्यांनी आत जाऊन चौकशी केली, असेही स्पष्टीकरण यादव यांनी दिल्याचे जनसत्ता या वृत्तपत्राने आपल्या वृत्ता म्हटले आहे.

Tags:    

Similar News