बमक Election मुंबई महापालिकेच्या निवडणुका Marathi मराठी मुद्द्यावर होत असताना मुंबईतल्या प्रसिद्ध अशा रमाबाई आंबेडकर नगरात म्हणजे वॉर्ड क्रमांक १३३ मध्ये वॉटर, गटर, मीटरच्या पलिकडील मुद्द्यांवर ही निवडणुक होत आहे. वंचित बहुजन आघाडी विरुद्ध शिवसेना (शिंदे सेना) अशी ही लढत असून धनशक्ती विरोधात जनशक्ती असं चित्र पाहायला मिळत आहे. लोकवर्गनीतून वंचित बहुजन आघाडीला लोकसहभाग मिळत आहे. तसेच ही लढाई फक्त मतांची नसून या परिसरात वर्षानुवर्षे प्रस्थापितांचं वर्चस्व असलेल्या सत्तेला पायउतार करण्याची असल्याचं पाहायला मिळत आहे. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आंबेडकरी चळवळीला रोहित जगताप या नावानं नवी पालवी फुटली आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणात उडी घेत वंचितांना शासनकर्ती जमात बनवण्याचं ध्येय असणाऱ्या रोहित जगतापशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधी प्रियंका यांनी...