तुमची मदत रणजितचा जीव वाचवू शकते, दात्यांनी सढळ हातानं मदत करावी

Update: 2025-07-21 16:19 GMT

कल्याण : रणजित आसाराम विधाते या १६ वर्षांच्या मुलाला गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा गंभीर आजार झाला आहे. त्याच्या कुटुंबियानं आतापर्यंत ४१ लाख रुपयांचा खर्च उपचारांसाठी केलेला आहे. मात्र, अजूनही त्याला पूर्णपणे या गंभीर आजारातून बरे होण्यासाठी १५ ते १६ लाख रुपयांची गरज आहे. त्यामुळं दानशूर नागरिकांनी रणजितला मदत करावी, असं आवाहन त्याच्या कुटुंबियांनी केले आहे.

वेदांत कल्याण हॉस्पीटलमध्ये सध्या रणजितवर उपचार सुरु आहेत. त्याला या आजाराची लागण झाल्यापासून विधाते कुटुंबियांनी आजवर तब्बल ४१ लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, अजूनही रणजितची आजाराशी झुंज सुरुच आहे. अशा परिस्थितीत त्याला पुढील उपचारासाठी आणखी १५ ते १६ लाख रुपये लागणार असल्याचं हॉस्पीटल प्रशासनानं सांगितलं आहे. विधाते कुटुंबियांची आता आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळं दानशूर दात्यांनी भरीव मदत केल्यास रणजित या आजारातून पूर्णपणे बाहेर येऊ शकतो, त्यासाठी खाली दिलेल्या माहितीनुसार दाते रणजितला आर्थिक मदत करु शकतात.

रणजितला आर्थिक मदतीसाठी PhonePe/ GPay/ UPI Id बँक खात्याचा तपशील खालीलप्रमाणे:

Phonpe/Gpay No.- 9309081757

UPI ID:- 9309081757-2@ybl

Account Holder:- Abhijit Vidhate

Bank Name: स्टेट बँक ऑफ इंडिया

A/C Number: 41678591440.

IFSC Code: SBIN0003842.

याशिवाय थेट हॉस्पीटलच्याही बँकेत दाते मदत देऊ शकतात. त्यासाठी खालील माहितीचा वापर करावा

Hospital Bank Details

Bank Name AXIS BANK LTD

BRANCE-KALYAN WEST (MH)

A/C NO-921020045072400

IFSC CODE: UTIB0000574

PLEASE ISSUE THE CHEQUE IN THE NAME OF VEDANT KALYAN HOSPITAL




 


Tags:    

Similar News