मरणानंतरही कोरोना पेशंटची अवहेलना....स्मशानभूमीत पैशांची मागणी

Update: 2020-07-16 03:52 GMT

कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जळगावातील स्मशानभूमीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्याने मृतदेह अंत्यसंस्काराअभावी तब्बल 5 ते 6 तास रुग्णालयातच ठेवावा लागला. बुधवारी हा धक्कादायक प्रकार घडल्याने सरकारी यंत्रणेचा असंवेदनशीलपणा समोर आला आहे. याविरोधाततीव्र संताप व्यक्त होत आहे.

पाचोरा शहरातील एका 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्या व्यक्तीवर जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा बुधवारी सकाळी 10 वाजता मृत्यू झाला.

हे ही वाचा..

जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

धारावी: अनलॉक केल्यानंतर परिस्थीती ठीक होण्यास काही वर्ष लागतील…

मृत्यूनंतर कोविड रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी स्मशानभूमीत गेले तेव्हा त्यांच्याकडे 3 हजार रुपये मागण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनेक तास मृतदेह पडून राहिल्याने शेवटी अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी लोकसंघर्ष मोर्चान करून दिली.

कोरोनाबाधीत महिलेचा मृतदेह 8 दिवस बाथरुममध्ये पडून राहिल्याचा जळगावातील प्रकार ताजा असताना या घटनेने इथल्या शासकीय यंत्रणेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Similar News