Home > News Update > जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

जातपडताळणी प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
X

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यानाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्याची वाढीव मुदत दिली जाईल, अशी घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) च्या विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे.

हे ही वाचा..

मरणानंतरही कोरोना पेशंटची अवहेलना….स्मशानभूमीत पैशांची मागणी

जगभरातील बडे नेते, कंपन्या आणि सेलिब्रिटींचे ट्विटर हॅक

कंटेनमेंट झोनमध्ये सण साजरे करण्यास मनाई

मेडिकल आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना नोंदणी करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे असते, मात्र लॉकडाऊनच्या काळात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा पेच निर्माण झालेला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून बुधवारी तातडीने प्रस्ताव तयार करून आदिवासी विभागामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

Updated : 16 July 2020 1:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top