येत्या काळात देशात जैव इंधनांच्या उत्पादनाला गती देणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Update: 2021-10-11 02:18 GMT

नवी दिल्ली  :देशात होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांमधून तीव्र संताप पाहायला मिळत असताना, कच्चे तेल आणि इंधन वायूंच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, जैव इंधनांच्या उत्पादनाला गती देणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. यासाठी गडकरी यांनी स्वतःच्या डिझेल ट्रॅक्टरचे सीएनजी वाहनात रूपांतर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोनियाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) तर्फे इंदूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सोयाबीन परिषदेला संबोधित करताना गडकरी बोलत होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, मी स्वतः माझ्या ट्रॅक्टरचे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनात रूपांतर केले आहे. कच्चे तेल आणि इंधन वायूंच्या आयातीवर आपण अवलंबून आहोत हे कमी करण्यासाठी, आपण सोयाबीन, गहू, धान, कापूस इत्यादी पिकांच्या शेतातील कचऱ्यापासून बायो-सीएनजी आणि बायो-एलएनजी सारख्या जैव इंधनांच्या उत्पादनास प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीतून अतिरिक्त उत्पन्नही मिळेल आणि इंधन दरवाढीच्या समस्येपासून आपल्याला काहीसा दिलासा मिळेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशातील इंधनांचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. सामान्य माणसाला याची मोठी झळ बसत आहे. त्यामुळे जैव इंधनांच्या उत्पादनास प्रोत्साहन दिल्यास आपल्याला काहीसा दिलासा मिळेल.

Tags:    

Similar News