महायुतीतील दोन पक्षातील काही मंत्री आणि आमदारांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती आहे. अंधेरीतील एका मॉडेल कॉर्डीनेटर ला हे काम सोपवण्यात आलं असून काही महत्वाच्या मंत्र्यांना हनी ट्रॅप मध्ये अडवण्यासाठी जाळं फेकण्यात आले आहे. कमरेखाली कमजोर नेते शोधून त्यांना अडकवण्यासाठी गेले तीन महिने एक एजन्सी काम करत असून या मिशन मध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आल्याची माहिती आहे.
कोण आहे हा मॉडेल कॉर्डीनेटर ?
राज्यातील महायुती सरकारमधील दोन महत्वाच्या पक्षातील काही मंत्री व आमदारांवर काही महिन्यांपासून जाळं फेकण्यात आलं आहे. या नेत्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून ब्लॅकमेल करण्याची सुपारी एका प्रसिद्ध मॉडेल कॉर्डीनेटर ला देण्यात आली आहे. हा मॉडेल कॉर्डीनेटर दिल्लीतील काही महत्वाच्या लोकांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती आहे. ज्यांना जाळ्यात अडकवायचं आहे त्यांचा पूर्ण रिसर्च या कॉर्डीनेटर कडे दिलेला असून त्या पद्धतीने काही मॉडेल्सचे पोर्टफोलीयो ही तयार करण्यात आल्याची माहिती आहे. आपसातील भांडणांमुळे ही माहिती राजकीय वर्तुळात ‘लीक’ झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
कुठल्या पक्षातील नेते संकटात ?
xणे शहरातील दोन नेत्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना टार्गेट करण्यात आले असून येत्या महापालिका निवडणुकांच्या आधी हा टास्क पूर्ण करण्याचं काम त्या मॉडेल कॉर्डीनेटरवर सोपवण्यात आले आहे. त्यामुळे हा हनी ट्रॅप ब्लॅकमेलींग साठी नसून राजकीय गणितांसाठी असल्याची जोरदार चर्चा आहे.
सध्या लिव्ह-इन मध्ये असलेल्या एका राजपुत्राला ही या हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती मिळतेय.
सोमय्या आणि नाशिक मधील हनी ट्रॅप च्या चर्चेनंतर आता ही नवी चर्चा खळबळ माजवणारी आहे. हा ट्रॅप टाकणारा नेमका कोण आहे ? अशा ट्रॅप ची नेमकी गरज कुणाला आहे, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहेत. निवडणुकांच्या तोडांवर महायुतीमध्येच बेबनाव निर्माण होणार हे गृहीत होते, मात्र असे षडयंत्र रचण्यामागे कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या ऑपरेशन मध्ये नेमकं कोण कोण टार्गेट होतं, हे मात्र कळू शकलेलं नाही.