शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कोण -कोणाला भिडणार ....

Update: 2023-01-12 12:38 GMT

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासुन राज्यात येणारी प्रत्येक निवडणुक हा चर्चेचा विषय असते .: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे नाशिक ,अमरावती पदवीधर व औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूकीत चुरस पाहायला मिळणार आहे. या सहा जागासाठी येत्या 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार असुन दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

कोण - कोणाला भिडणार ...

कोकण शिक्षक मतदार संघ-
बाळाराम पाटील ( शेतकरी कामगार पक्ष ) विरुध्द ज्ञानेश्वर म्हात्रे ( भारतीय जनता पार्टी ).
कोकण शिक्षक मतदार संघ- ह्या मतदार संघात महाविकास आघाडी कडुन बाळाराम पाटील ( शेकाप) यांना समर्थन देण्यात आले आहे. तर भाजपाकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ-

विक्रम काळे ( राष्ट्रवादी )विरुध्द किरण पाटील ( भाजप)
ह्या मतदार संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असुन राष्ट्रवादीकडुन विक्रम काळे यांना रिंगणात उतरले आहे . तर भाजप कडुन काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील ह्याना या मतदार संघात उतरुन हा मतदार आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न असणार आहे .

नाशिक पदवीधर-

सत्यजित तांबे (अपक्ष) विरुध्द धनराज विसपुते (अपक्ष) विरुध्द धनंजय जाधव (अपक्ष)

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेंस निर्माण झाला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.तर काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला , या मतदार संघातील भाजपाने उमेदवार न दिल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुक एकतर्फी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .

नागपूर शिक्षक-

गंगाधर नाकाडे (मविआ - शिवसेना) विरुध्द नागो गाणार ( भाजप पाठींबा)

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या गटाकडुन गंगाधर नाकाडे यांना उमेदवारी देण्यात आले आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागो गाणार यांना भाजपाने पाठिंबा दिला आहे.

अमरावती पदवीधर

धीरज लिंगाडे (मविआ - कॉग्रेस) विरुध्द डॉ. रणजित पाटील ( भाजप उमेदवार)

अमरावती पदवीधर संघात काँग्रेसचे उमेदवार धिरज लिंगाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . तर भाजपाकडुन डॉ. रणजित पाटील रिंगणात आहेत.त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे .

Tags:    

Similar News