मुख्यमंत्री आज काय बोलणार?
What maharashtra CM Uddhav thackeray will talk today? जागतिक महामारी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास राज्यात कमी होत असताना आगामी दिवाळी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी दीड वाजता फेसबुकच्या माध्यमातून ला येणार आहेत.
महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोना परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती नागरिकांना सातत्याने देत आहेत. आज दुपारी १.३० वाजताही मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते दिवाळी, बिहार निवडणुकीचे अंदाज आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मंदिरा उघडण्यासाठी विरोधी पक्ष भाजप सातत्याने आंदोलन करत आहेत.
त्याचबरोबर मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी खुला करण्याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वसामान्य जनता डोळे लावून आहे. दरम्यान, राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर उद्धव ठाकरे विविध कामांचे ऑनलाईन लोकार्पण करणार आहेत.