पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा झटका, मुकुल रॉय यांची तृणमूल कॉंग्रेसमध्ये घरवापसी

Update: 2021-06-11 09:17 GMT

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत (West Bengal Assembly Election) भाजपला पराभवाचा झटका देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी भाजपला आता आणखी एक झटका दिला आहे.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय (Mukul Roy) आणि त्यांचे चिरंजीव शुभ्रांशु रॉय ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या संदर्भात स्वत: मुकुल रॉय यांनी माहिती दिली आहे. विशेष बाब म्हणजे निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री राजीव बॅनर्जी, माजी आमदार सव्यसाची दत्ता सहित अनेक नेत्यांची टीएमसी मध्ये घरवापसी होणार आहे.

नुकतीच तृणमूल कॉंग्रेसची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत ममता बनर्जी (Mamata Banerjee) सहीत पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) उपस्थित होते. यावेळी मुकुल रॉय यांची घरवापसी निश्चित झाली. मुकुल रॉय हे तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे पहिले नेते आहेत. आणि भाजपच्या पराभवानंतर पुन्हा एकदा तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणारे देखील पहिले नेते आहेत. 2017 मध्ये त्यांनी तृणमूल कॉंग्रेसला राम राम करत भाजपचं कमळ हातात घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजप वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.

Tags:    

Similar News