गावगाड्याचे इलेक्शन : मतदानासाठी यंत्रणा सज्ज, उमेदवारांच्या भेटीगाठी

Update: 2021-01-14 15:17 GMT

औरंगाबाद : राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींज शुक्रवारी मतदान होत आहे. त्यात मराठवाड्यात 4 हजार 134 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. तर यात औरंगाबाद जिल्ह्यातील 617 ग्रामपंचायत आहेत. त्यातील 35 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्याने 582 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

मतदानासाठीचे साहित्य वाटप औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी करण्यात आले आहे. मराठवाड्यातील एकूण 388 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या असल्याने तिथं मतदान होणार नाही. दरम्यान प्रशासनाची निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

'रात्र वैऱ्याची'

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार प्रत्यक्षात बुधवारी संपला आहे. मात्र अप्रत्यक्षरित्या प्रचार सुरुच असून,गाठीभेटी सुद्धा घेतल्या जात आहे. त्यासाठीच गुरूवारची रात्र महत्वाची आहे. कारण उमेदवार रात्रभर गावातील लोकांची भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करतात. त्यामुळे रात्र वैऱ्याची असल्याचं ग्रामीण भागात चर्चा आहे.

Tags:    

Similar News