''Itne saare kapde?'' उर्फी व जावेद अख्तर भेट, मग नेटकरी काय म्हणतायत?

Update: 2023-01-08 13:51 GMT

अनेक दिवस आपण समाजमाध्यमांवर तसेच मुख्य माध्यमांमध्ये सुद्धा पाहतो आहोत ती चर्चा म्हणजे उर्फी जावेद आणि चित्र वाघ यांच्यातील रंगलेला जोरदार वाद. या वादाने आत्तापर्यंत अनेक वळणे घेतली. ट्विटर वॉर पासून सुरु झालेला हा वाद थेट महिला आयोगापर्यंत गेला. मागच्या काही दिवसात पाहिलं तर उर्फी तिच्या सोशलमिडीया अकॉउंट वर वारंवार चित्रा वाघ यांना डिवचताना पाहायला मिळतीये.. आता उर्फीने जावेद अख्तर यांची भेट घेतली आहे. तिने त्यांच्यासोबतच एक फोटो तिच्या अकॉउंट वरून शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करून काय म्हंटल आहे? यावर लोकांच्या काय कॉमेंट आल्या आहेत? 

 मॉडेल उर्फी जावेद कायम तिच्या हटके कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फीच्या सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट आहेत, तोतडे कपडे खालून उर्फी वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे शूट करत असते. याच तिच्या हटके स्टाइलमुळे तिच्यावर वारंवार टीकेची झोड उडत असते.. एकीकडे आपण जर तिच्यावर होणारी टीका पहिली आणि दुसरीकडे तिला मिळणारे व्हव्ज पहिले तर तिचे फॅनफॉलोअर्स अफाट आहेत. मिलियन मध्ये तिचे फॅनफॉलोअर्स आहेत. आता याच उर्फी जावेडावर चित्र वाघ तुटून पडल्या असताना ती देखील त्यांना अगदी जशास तसे उत्तर देताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा उर्फीची चर्चा सुरु झाली आहे, ती म्हणजे तिने आज बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार, शायर आणि पटकथा लेखल जावेद अख्तर यांची भेट घेतली आहे. तिने जावेद अख्तर यांच्यासोबतच फोटो शेअर करत '' Finally I met my grandfather'' असं कॅप्शन दिल आहे..

 आता उर्फीने ने जावेद अख्तर यांच्यासोबतच फोटो शेअर केल्यानंतर या फोटोवर अनेक कॉमेंट्स येत आहेत.. त्या कॉमेंट काय आहेत हे दिखील पाहुयात.. Dexter हे ट्विटर वापरकर्त्ये या फोटोवर कॉमेंट करताना म्हणत आहेत की, Itne saare kapde?..

 आता या फोटोमध्ये तिच्या कपड्यावरून कॉमेंट येणार हे साहजिक आहे.. अनेकांनी तिच्या कपड्या बद्दल भाष्य केलं आहे. पण एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे भारतीय संविधानानेच प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामध्ये तिने कोणते कपडे घालायचे, तिने काय खायचं हा वास्तविक तिचा वयक्तिक प्रश्न आहे. बाकी कॉमेंट करणार्यांना आपण काहीच करू शकत नाही.. Debashis Ghosh हे ट्विटर वापरकर्ते म्हणत आहेत की, Perfect jodi...

 आता आपण जर आणखील खाली पाहिलं तर पुन्हा तिच्या कपड्यावरच खूप कॉमेंट्स आहेत.. Rio हा ट्विटर वापरकर्ता महणतो आहे की, नशीब आज तरी कपडे घालून गेलीस 🤣🤣

 आता पुन्हा तेच या फोटो मध्ये उर्फीने निळ्या रंगाचं एक जॅकेट घातलं आहे. लोकांना काय तिने अंगभर कपडे घातले तरी प्रॉब्लेम आहे आणि ती तिच्या हटके स्टाइल मध्ये दिसली तरी प्रॉब्लेम आहे. बाकी तुम्हाला उर्फीबाबत काय वाटतं? कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा...

Tags:    

Similar News