विना मुख्यमंत्र्यांचे कुठे राज्य चालत असते का? ; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची टीका

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विना मुख्यमंत्र्यांचे कुठे राज्य चालत असते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला

Update: 2021-12-20 02:57 GMT

जालना // केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विना मुख्यमंत्र्यांचे कुठे राज्य चालत असते का? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत शिवसेनेच्या एक मंत्र्यांचा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली असती तर हे राज्य चालले नसते का ? असं म्हटले आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते.

"हे काय म्हणतात, आमचं कुटुंब आमची जबाबदारी. मुख्यमंत्री परभणीला आले तेंव्हा तेथील हॉटेलवाल्यांनी त्यांना म्हटलं की, आम्हाला पॅकेज द्या. मोदींनी जसं पॅकेज दिलं तसं राज्यातही पॅकेज द्या आणि मुख्यमंत्री म्हणतात आपलं कुटुंब आपली जबाबदारी. हा मुख्यमंत्री कुटुंबाचा जबाबदार आहे की राज्यातल्या १२ कोटी लोकांचा तुम्हीच सांगा. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभलाय. आता तर दोन महिन्यांपासून कुठे आहे पठ्ठ्या हे काहीच सांगू शकत नाही," असं केंद्रीय मंत्री दानवे यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News