महाराष्ट्रातील जनतेच्या जीवापेक्षा प्रचार महत्त्वाचा, मोदींनी मुख्यमंत्र्यांचा फोन नाकारला

Update: 2021-04-17 13:54 GMT

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील उद्योजकांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहन उद्योजकांना केले.


यावेळी उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजनची राज्याला खूप गरज असून सध्या सर्व उत्पादित ऑक्सिजन वैद्यकीय कारणास्तव वापरला जात आहे. रुग्ण संख्या पाहता आणखी ऑक्सिजनची गरज भासत असून आपण पंतप्रधानांना देखील तसे कळविले आहे. कालही त्यांना संध्याकाळी संपर्क केला होता.


मात्र ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त असल्याने बोलणे होऊ शकले नाही. मात्र, केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य मिळते आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.



दरम्यान एका राज्याचे मुख्यमंत्री लोक मरत असताना ऑक्सिजन ची मागणी करण्यासाठी फोन करतात. मात्र, देशाच्या पंतप्रधानांचं लक्ष लोकांच्या समस्यांपेक्षा निवडणुकीवर अधिक असल्यानं लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.


Tags:    

Similar News