ED आणि CBI प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय

Update: 2021-11-14 12:05 GMT

नवी दिल्ली // केंद्र सरकारने आज ED आणि CBI प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोन्ही तपास यंत्रणांच्या संचालकांची नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जात होती. सध्या सीबीआयचे प्रमुख सुबोध जैस्वाल आणि ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत.

केंद्र सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. यानंतर, तीन वर्षांसाठी (1+1+1) मुदतवाढ दिली जाणार आहे.दरम्यान प्रत्येकी एक वर्षासाठी तीन मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ते एकूण 5 वर्षांपेक्षा जास्त असू नाही शकत.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात , 2018 मध्ये जारी करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशात बदल करून केंद्र सरकारने ED चे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्यात आला होता. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपला होता मात्र, त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

1997 पूर्वी CBI संचालकांचा कार्यकाळ निश्चित नव्हता आणि सरकार त्यांची कधीही बदली करू शकत होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने विनीत नारायण यांच्या निकालात CBI संचालकांना स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी देण्यासाठी किमान दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित केला होता.

Tags:    

Similar News