#धक्कादायक : जळगावमध्ये 80 संशयीत रुग्णांचे स्वॅब गायब

Update: 2020-06-04 01:53 GMT

जळगाव ( Jalgaon) जिल्हयात कोरोनासारख्या (corona) युद्धजन्य परिस्थितीतही आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याची संतापजनक बाब आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड (covid) सेंटरमध्ये 80 संशयित रुग्णांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते.

मात्र, हे स्वॅबच ( swab) हरवले आहेत. ते कोणत्या प्रयोगशाळेत पाठवले होते? प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यांचे अहवाल आलेत का? याबाबतची कोणतीही माहिती यंत्रणेकडे नाही. याबाबत खुद्द जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोग्य मंत्र्यांसमोर कबुली दिली. माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी राज्य सरकारवरच अकार्यक्षमतेचा आरोप केला.कोरोना झालेल्या रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही असा आरोप महाजन यांनी केला.

हे ही वाचा...


'निसर्ग'चा जोर ओसरला, आता मुसळधार पावसाचा अंदाज

एक व्हाट्सअप मेसेज, ... मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतोय!

...म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले सर्वांचे आभार

जळगावची परिस्थिती गंभीर असली तरी नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केलाय, मुंबईच्या धर्तीवर जळगावातही कोविड रुग्ण तसच मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान गेल्या 24 तासात जळगाव जिल्ह्यात 71 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण पहिल्यांदाच आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण 871 कोरोना रुग्ण आहेत तर 107 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Similar News