जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, दादांचा पाठींबा असेल तर...

जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, दादांचा पाठींबा असेल तर...

Update: 2021-01-22 05:36 GMT

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना

'जयंत पाटलांनी जी काही इच्छा प्रदर्शित केली आहे त्याला मी पाठिंबा देतो.'

असं सूचक वक्तव्य केलं होतं.

त्यानंतर या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना...

'दादा त्याच्यावर काल बोलले आहेत. दादांचा जर पूर्ण आपल्याला पाठिंबा असेलच तर आम्हाला कशाला असेल. मला तर वाटतं कुठल्याही संघटनेला असेल सेनेच्या कार्यकर्त्याला असेल प्रत्येक संघटनेला वाटत असतं आपला माणूस आपल्या विचाराचा राज्याचा नेता मुख्यमंत्री व्हावा. त्यात गैर काय? ही आनंदाची गोष्ट आहे. Ambitions सर्वांना असते.'

असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं होतं जयंत पाटील यांनी...

,"आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल. एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,"

अशी इच्छा बोलून दाखवली होती..

Tags:    

Similar News