"सख्त राहों में भी आसान सफर लगता है..." सोनू सूदने सोडलं मौन

Update: 2021-09-20 08:48 GMT

कर चोरीप्रकरणी इनकम टॅक्स विभागाने केलेल्या कारवाईवर अखेर अभिनेता सोनू सूदने मौन सोडले आहे. सोनू सूदने ट्विटरवर आपले निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्याने आपण कोणतीही कर चोरी केली नसल्याचे म्हटले आहे. २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा कर चुकवल्या प्रकरणी इनकम टॅक्स विभागाने सोनू सूदची चौकशी केली होती. सोनू सूदने परकीय दात्यांकडून क्राउडफंडिंगद्वारे कोट्यावधी रुपये गोळा केले आणि परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा दावा इनकम टॅक्स विभागाने केला आहे. सोनूने सोशल मीडियावर आपले निवेदन प्रसिद्ध केले आहे.

"सख्त राहों में भी आसान सफर लगता है, हर हिंदुस्तानी की दुआओं का असर लगता है... अशा वाक्यांनी त्यान आपल्या निवेदनाची सुरूवात केली आहे. "माझ्या सर्व क्षमतेनुसार आणि मनापासून प्रत्येक भारतीयाची सेवा करण्याची शपथ मी घेतली आहे. माझ्या फाऊंडेशनमधील पै अन पै ही गरजू आणि अनेकांचा मौल्यवान जीव वाचवण्यासाठीच आहे. विविध ब्रॅंड्सनी माझ्या एन्डोर्सेमेंटची फी गरजू लोकांना द्यावी यासाठी मी सातत्याने त्यांना प्रोत्साहित केले आहे. पाहुण्यांसोबत असल्याने ४ दिवस मी जनसेवेत येऊ शकलो नाही पण आता मी सेवेसाठी पुन्हा तत्पर आहे. माणुसकीच्या सेवेचे काम असेच सुरू राहिल" असे म्हणत

"कर भला, हो भला, अंत भले का भला. जय हिंद" असा आपल्या निवेदनाचा शेवट केला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोनू सूदने स्थापन केलेल्या चॅरिटी फाउंडेशनने वर्षभरात १८ कोटींपेक्षा जास्त देणगी गोळा केली होती. त्यापैकी १ कोटी ९० लाख कोटी रुपये त्याने मदतीसाठी खर्च केले. पण उर्वरित १७ कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत. लखनऊमधील एका मुलभूत सुविधा तयार करणाऱ्या ग्रुपवच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये सोनुने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याच ठिकणी कर चोरी आणि अनियमित नोंदींचे पुरावे सापडल्याचा आयकर विभागाचा दावा आहे.

Tags:    

Similar News