लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र या, विरोधी पक्षाच्या बैठकीनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया

Update: 2021-08-20 13:35 GMT

आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षाच्या 19 पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, फारूक अब्दुल्ला, स्टालिन, ममता बॅनर्जी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होता.

या बैठकीसंदर्भात स्वत: शरद पवार यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केलं आहे.

सोनिया गांधी यांच्या प्रयत्नाने आज समान विचारधारा असणाऱ्या विरोधी पक्षाची एक बैठक पार पडली. ऑनलाईन पार पडलेल्या बैठकीत सहभागी होऊन आपले विचार व्यक्त केले.

मी वास्तविकपणे देशातील सद्यस्थिती पाहता या अतिमहत्त्वाच्या बैठकीच्या आयोजनासाठी उचललेल्या पाऊलांचं कौतुक करतो. भारताची सध्याची परिस्थीती चिंताजनक आहे.

शेतकरी अनेक महिन्यांपासून विरोध करत आहे. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशासाठी वाईट चित्र आहे. आर्थिक मंदी, कोविड महामारी, बेरोजगारी, सीमावाद, अल्पसंख्याक समुदायांतील लोकांचे प्रश्न आज देशासमोर आहेत.

सध्याचं सरकार हे सर्व प्रश्न सोडण्यात अपयशी ठरलं आहे. जे लोक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतात. जे लोक आपल्या देशातील लोकशाहीच्या सिद्धांतांना वाचवण्यासाठी काम करु इच्छितात. त्यांना एकत्र येण्याचं मी आवाहन करतो आहे.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1428695443261726730

अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.

कोणत्या पक्षाचे नेते सहभागी झाले होते?

कॉग्रेस, तृणमूल कॉंग्रेस (TMC), NCP, DMK, शिवसेना, JMM, CPI, CPI(M), नेशनल कॉन्फ्रेंस, राजद, AIUDF, विदुतलई चिरुतैगल काट्ची ( Viduthalai Chiruthaigal Katchi), लोकतांत्रिक जनता दल, JD(S), RLD, RSP, केरल कॉग्रेस(M), PDP आणि IUML।

Tags:    

Similar News