जळगाव महापालिकेत राडा, भाजप- शिवसेना नगरसेवक एकमेकांना भिडले

Update: 2021-12-15 14:33 GMT

भाजपच्या हातून जळगाव महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन महासभा घेण्यात आली. महासभा सुरू होताच भाजपमधून फुटून शिवसेनेत गेलेल्या आणि उपमहापौर पदावर बसलेल्या कुलभूषण पाटील यांच्यात आणि भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात खुर्चीवर बसण्यावरून वाद झाला. उपमहापौर नियमानुसार आयुक्त आणि महापौर यांच्या बरोबर बसू शकत नाही, ह्यावरुन वाद झाला, मात्र हा वाद शांत होत नाही तोच दुपारनंतर दलित वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटप करण्याबाबत मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी खाडाखोड केल्याचा भाजपने आरोप केला, यावरून उपमहापौर आणि भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात चांगलाच राडा झाला. भाजप नगरसेवक महापौर आणि उपमहापौर यांच्या डायसवर जाऊन भिडले, दोघांमध्ये धक्काबुकीं आणि हनामारीही झाली. शिवसेना आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी घोषणाबाजी केली.

कोविड आणि लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ऑफलाइन सभा घेण्यात आली. त्यातही भाजपचं स्पष्ट बहुमत असतांना लॉकडाऊन काळात शिवसेनेने भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत भाजपमधील 26 नगरसेवक फाडून महापालिकेत ऑनलाईन मतदान घेऊन सत्ता मिळवली. यात भाजपचे फुटीर नगरसेवक कुलभूषण पाटील यांना उपमहापौर पद मिळालं होतं. निधी खर्चावरून मतदान घेण्यात आले त्यात भाजप आणि शिवसेनेला 26-26 अशी मतं पडली. पण उपमहापौरांनी मतांमध्ये खाडाखोड केल्याचा भाजपचा आरोप करत यात एक मत भाजपला जास्त पडल्याचा दावा भाजपने केला ह्यावरून हा भाजप सेनाचा राडा झाला.

Tags:    

Similar News