महागाईच्या विरोधात औरंगाबादमध्ये आज शिवसेनेचा मोर्चा

Update: 2021-11-13 02:50 GMT

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आज शिवसेनेकडून महागाईच्या मुद्द्यावरून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे जी महागाई भडकली आहे, त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

केवळ औरंगाबादेतच नाही तर संपूर्ण देशभरातील नागरिक महागाईचे चटके सोसत आहेत, पण कुणीही आवाज उठवायला तयार नाही, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भाजपकडून महागाई विरोधात आंदोलनं केली जात आहेत. हा खरोखरच विनोद आहे अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की, औरंगाबादचं आक्रोश आंदोलन दिल्लीच्या राज्यकर्त्यांपर्यंत नक्कीच पोहोचेल. त्रिपुरा घटनेचे पडसाद राज्यात उमटले याबाबत बोलताना ते म्हणाले की, त्रिपुराच्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात दगडफेक करायचं काही कारण नाही.

महाराष्ट्रात सर्व समान, सर्व जातीधर्मीयांचे सद्भावना असलेले सरकार आहे. त्रिपुरातील परिस्थितीची आम्हालाही चिंता आहे, तिथे शांतता राहावी, अराजकता नांदू नये ही आमची भूमिका आहे. भाजपाला अशाच प्रकारे देशात अशांतता पसरवून सत्ता कायम ठेवायची आहे, असेही राऊत म्हणाले.

Tags:    

Similar News