ठाकरे सरकारला घरचा आहेर, सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारानेच ठोकलं महावितरणला टाळं
जळगाव: ऐन पेरणीच्या काळात महावितरण कंपनीकडून कृषी पंपांच्या वीज बिलांची शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली सुरू आहे. ट्रान्सफार्मर मिळत नाही, याविरुद्ध सत्तेतील भागीदारी असलेले आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले. यावेळी आमदारांनी महावितरण कंपनीच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांना कुलूप ठोको आंदोलन केले. पाचोरा भडगाव चे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना पोलिसांनी अटक केली, नंतर सोडून देण्यात आले.
महावितरण कंपनीच्या मनमानी आणि शेतकऱ्यांना त्रास देणे महावितरण कंपनीने बंद केले नाही, तर शिवसेना स्टाईलने पुढे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या आमदार किशोर पाटील यांनी आंदोलन पुकारल्याने महाविकास आघाडी बरोबर शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही घरचा आहेर दिलाय.ठाकरे सरकारला घरचा आहेर, सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारानेच ठोकल महावितरणला टाळ