सत्यशोधक समाजाचा स्थापना दिन उत्साहात साजरा

Update: 2022-09-24 12:01 GMT

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील जातीभेदाविरोधात सर्वप्रथम आवाज उठवला. पण केवळ या प्रथांना विरोध करणे पुरेसे नाही तर त्याविरोधात जनजागृती होणे गरजेचे आहे, त्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी धार्मिक मक्तेदारी, एकाधिकारशाही, अनिष्ट प्रथा-परंपरा, चालीरीती, धार्मिक पाखंड, वर्ग आणि वर्णव्यवस्था याविरोधात आवाज उठवला.

यासर्व त्रासातून समाजाला मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७४ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे धार्मिक सुधारणांचा पाया आणि मानव मुक्तीचे पहिले पाऊल होते असे मत शरद शेजवळ यांनी व्यक्त केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय, राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला येथे सत्यशोधक समाज स्थापना दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Tags:    

Similar News