समृध्दी महामार्गाला अपघाताचे ग्रहण.

Update: 2022-04-28 08:28 GMT

बहुचर्चित समृध्दी महामार्गाचा श्रेयवादावरुन वाद चालू असतानाच आता त्या महामार्गाला अपघाताचे ग्रहन लागले आहे.बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला अपघाताचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.

या महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे, मात्र बांधकाम सुरू असतानाच जवळपास 80 फूट उंचावरून या पुलाचे काही गर्डर खाली कोसळले, आणि यामध्ये पुलाच्या खाली उभा असलेला एक ट्रेलर अक्षरक्ष: चकनाचूर झाला. या ठिकाणी काम करणार्‍या मजुरांची मध्यान्ह भोजनाची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

सिंदखेडराजा तालुक्यातील साखळी क्रमांक ३३२+६६५ वरील व्हायडक्ट च्या ठिकाणी दुपारी ३:३० वाजता क्रेन च्या सहाय्याने काँक्रीट गर्डर पुलाच्या पियर वर ठेवण्याचे काम सुरू होते. क्रेन च्या सहाय्याने गर्डर वर उचलत असताना साधारण पणे १० फुट उंच उचलल्यानंतर क्रेन ला लावलेला जॅक स्लिप झाल्यामुळे गर्डर खाली जमिनीवर कोसळला. काम करताना सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली होती तथापि दुर्दैवाने जॅक निखळल्यामुळे अपघात झालेला आहे. अपघाताच्या ठिकाणी कोणतीही जिवित व वित्त हानी झालेली नसून काम पूर्ववत सुरू करण्यात आलेले आहे.

पुन्हा एकदा या महामार्गावरील बांधकामाच्या सुरक्षितते संदर्भात आता ऑडिट करणे गरजेचे असल्याची मागणी केली जात आहे

Tags:    

Similar News