संभाजी भिडे RSS व BJP चा लाडका, गृहविभाग कारवाई करणार का ? Vikas lawande

Update: 2023-07-28 13:38 GMT

शिवप्रतिष्ठान नावाची संघटना चालविणाऱ्या संभाजी भिडे हे जाणिवपूर्वक धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य सार्वजनिक रित्या करत असतात. हिंदू-मुस्लीम धार्मिक तेढ निर्माण करणं हा भिडे यांचा आवडता विषय आहे. नुकतंच भिडेंनी महात्मा गांधी यांचं चारित्र्य व प्रतिमा हनन केलंय. भिडेंची सगळी वादग्रस्त वक्तव्यं इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र, गृहविभागाकडूनही त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. म्हणून भिडे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारं पत्रच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी पोलिस प्रशासनाला दिलंय.

Full View

हिंदू-मुस्लिम समाजाध्ये धार्मिक तेढ निर्माण करणं हा संभाजी भिडेचा आवडता विषय आहे. भिडे हा खोट्या इतिहासाचं कथन करून तरुणांची माथी भडकवत असतो. तो हिंदू आतंकवादी असल्याचं मागील काही वर्षातील वर्तनावरून स्पष्ट होतंय. कोरेगाव भीमा दंगलीचा मास्टर माईड सुद्धा भिडेच आहे. मध्यंतरी त्याने 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाहीच व तिरंगा ध्वजाबद्दल सुद्धा अवमानकारक वक्तव्य केलेले आहे. हे सर्व प्रसारमाध्यमात उपलब्ध असून पुराव्यासाठी आपण गुगल द्वारे सर्च घ्यावा. हे सर्व वक्तव्य अतिशय गंभीर आहेत. मात्र, गृह विभागाकडून त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्याचा गैरफायदा संभाजी भिडे घेत असल्याचा आरोप लवांडे यांनी केलाय.

याच संभाजी भिडेने अमरावती येथे राष्ट्रपुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे चारित्र्यह्नन व प्रतिमाह्नन केलेले आहे. "मोह्नदास गांधी यांचे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार होते. मोहनदास गांधीजींचे वडील चोरी करून पळून गेले होते. त्यानंतर त्यांच्या आईला मुस्लिम जमीनदाराने पळवलं होतं. त्यामुळे गांधीजींचे वडील तो जमीनदार होता” असे अतिशय संतापजनक वक्तव्य संभाजी भिडेने केलेलं आहे. म. फुले यांच्या बद्दलही हा माणूस अवमानकारक वक्तव्य करत असतो. तसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. गांधीजी हे राष्ट्रपिता असून महान राष्ट्रपुरुष आहेत. जागतिक अहिंसा दिन' त्यांचे जन्मदिनी जगभर साजरा केला जातो. गांधीजींचा जाहीर अवमान केल्या बद्दल व समाजातील गांधी प्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल संभाजी भिडेवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीच विकास लवांडे यांनी केलीय.

Tags:    

Similar News