गुणरत्न सदावर्तेंना एका प्रकरणात दिलासा,अटकपूर्व जामीन मंजूर

Update: 2022-04-26 14:10 GMT

 (NCP)राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते.या आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेल्या अॅड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलासा दिला आहे.मात्र सदावर्ते यांच्यावर राज्यातील विविध पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सन २०२० मध्ये पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.२५ हजारांच्या जातमुचलक्यावर सूटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.याप्रकरणी चौकशीसाठी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज केला.मात्र आता कोल्हापूर पोलिस सदार्तेंना घेऊन ऑर्थर रोड जेलमध्ये घेऊन येत आहेत.

गुणरत्न सदावर्तेंनीच मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते,याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात सांगण्यात आले,मात्र सातारा पोलिसांनी याच संदर्भात दाखल अन्य गुन्ह्यात सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतलेले असल्याने आता पुन्हा त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची गरज काय?अशी विचारणा उच्च न्यायालयाकडून करण्यात आली.

दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती.

Tags:    

Similar News