धक्कादायक ! बलात्कारी आणि खूनी राम रहिम तुरुंगाबाहेर

पंजाब आणि उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हरियाणातील सच्चा डेरा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची तुरूंगातून सुटका करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Update: 2022-02-08 11:05 GMT

पंजाब आणि उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हरियाणातील सच्चा डेरा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची तुरूंगातून सुटका करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सच्चा डेरा सौदाचा प्रमुख असलेल्या गुरमीत राम रहीम याला साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आले होते. तर ऑगस्ट 2017 मध्ये गुरमीत राम रहीम याला न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र उत्तरप्रदेश आणि पंजाब निवडणूकीचा रणसंग्राम सुरू असताना मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राम रहीमची सुटका केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

सच्चा डेरा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी अटक करताना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. तर पंजाबमधील सच्चा डेरा सौदाचे अनुयायी रस्त्यावर उतरून अटकेचा विरोध करत होते. मात्र अखेर पोलिसांनी राम रहीमला अटक केली. त्यानंतर ऑगस्ट 2017 मध्ये न्यायालयाने राम रहीमला 20 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तर 2021 मध्ये 19 वर्षांपुर्वीच्या डेरा व्यवस्थापक रणजितसिंग याच्या हत्येप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाने सच्चा डेरा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याबरोबरच राम रहीम याला 13 लाख रूपये दंड आणि इतरांना 50 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर आता राम रहीम याला फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे.

राम रहीम याला फर्लो रजा मंजूर करण्यात आल्याने उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील निवडणूकीवर प्रभाव टाकण्यासाठीच राम रहीम याला रजा मंजूर करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. मात्र सच्चा डेरा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला फर्लो रजा मंजूर होणे आणि निवडणूका योगायोगाचा भाग आहे, असे मत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले. तसेच तीन वर्षे शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराला फर्लो रजा मिळणे हा कायदेशीर अधिकार आहे, असे मत यावेळी मनोहरलाल खट्टर यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देतांना व्यक्त केले.

Tags:    

Similar News