रणजीतसिंह डिसलेंनो कोरोना, त्यांना भेटलेले बडे नेते क्वारंटाईन होणार का?

Update: 2020-12-09 14:10 GMT

आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवून देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल कऱणाऱ्या सोलापुरच्या रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाल आहे. ते पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कारण ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाल्यानंतर डिसले यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, इतर काही मंत्री आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहनही डिसले गुरुजींनी केलं आहे.

गेल्या २-३ दिवसात डिसले यांनी मुंबईत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यावरण आदित्य ठाकरे, राज ठाकरेंची भेट घेतली होती. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह इतर नेत्यांच्याही त्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. तसंच काही माध्यमांच्या प्रतिनिधींशीही त्यांचा मुलाखतींच्या निमित्ताने संपर्क आला होता.

त्यामुळे रणजीत सिंह डिसले ज्यांना भेटल आहेत ते बडे नेते आता क्वारंटाईन होतील का हा प्रश्न आहे. त्यातच बुधवारी मंत्रिमंडळाची देखील बैठक पार पडली आहे.





Tags:    

Similar News