पुण्यात विना मास्क फिरलात तर ही कारवाई...

पुण्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नियमांचं पालन न करणाऱ्यांवर आता थेट कारवाईचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Update: 2020-06-26 02:31 GMT

पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असताना नागरिक निर्बंधांचे पालन करत नसल्याचं वारंवार दिसून येत आहे.

कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी सरकारनं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे देखील पालन अनेक ठिकाणी होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. यानुसार कोणतीही व्यक्ती मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालयांच्या ठिकाणी आढळून आल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असे पत्रक पुणे महापालिकेने प्रसिद्ध केलेले आहे.

हे ही वाचा..

मुंबईत १ हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू दडवले गेले?

#कोरोनाशी_लढा- गुजरात, महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाहणी करणार

लोकल कधी सुरू होणार? रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय

महापालिकेच्या त्या-त्या विभागांमधील अधिकाऱ्यांना या कारवाईचे अधिकार देखील देण्यात आलेले आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत सरकार आता हळूहळू सर्व व्यवहारांना परवानगी देत असताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन झालं पाहिजे, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पण पुण्यामध्ये अनेकजण या निर्बंधांचे पालन करत नसल्याचे दिसल्याने आता महापालिकेने ही कडक भूमिका घेतलेली आहे.

Similar News