Home > News Update > मुंबईत १ हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू दडवले गेले?

मुंबईत १ हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू दडवले गेले?

मुंबईत १ हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू दडवले गेले?
X

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सुमारे एक हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे

रूग्णालयाबाहेर झालेले पण विविध प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे 1000 मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत. आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार असल्याने याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या एका पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मुंबईत ज्या रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही दाखविण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधीकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे, अशांचा आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असेही किमान 1000 मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही.

हे ही वाचा..

लोकल कधी सुरू होणार? रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय

सोमवारपासून सलून उघडणार, असे असतील नियम

#कोरोनाशी_लढा- गुजरात, महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाहणी करणार

प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान 450 मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर 72 तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यूसंख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे.

असेच एक पत्र यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना 15 जून 2020 रोजी पाठविले होते. सुमारे 950 मृत्यू कोरोनामुळे झालेले असताना सुद्धा ते त्यावेळी दाखविण्यात आलेले नव्हते. त्यानंतर 16 जून 2020 रोजी मुंबईत 868 आणि मुंबईसह राज्यात एकूण 1328 मृत्यू अधिकचे दाखविण्यात आले. त्यानंतर पुन्हा असा प्रकार घडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

Updated : 26 Jun 2020 1:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top