Pune मुलींना जातिवाचक शिवीगाळ प्रकरण, पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे कोर्टाचे आदेश
पुणे कोथरूड भागात ३ मुलींना जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी कोथरूड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा पोलिस अधिकारी-कर्मचारी यांच्यासह आठ जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचा आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने हा गंभीर विषय लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. कोथरुड प्रकरणात पोलिसांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी ३ ऑगस्ट २०१५ ला पीडित महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील नेते यांनी पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं.
परंतु, संबंधित पोलिसांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सार्वजनिक ठिकाणी असे काहीही झाले नसल्याचे आणि पुरावे नसल्यानं पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही असं पोलीस प्रशासनाकडून पत्राद्वारे सांगण्यात आलं होतं.
पीड़ित मुलींनी माघार न घेता लढण्याचे ठरवलं आणि या प्रकरणात त्यांच्या पाठिशी समाजातील अनेकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांना लढाईची पहिली पायरी पार पाडता आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन रीट याचिका दाखल करण्यात आली होती. सुजात आंबेडकर, अंजली मायदेव, रोहित पवार तसेच समाजातील अनेक लोकांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला यश मिळाल्याचं लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या श्वेता पाटील यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हटलं आहे.
https://www.facebook.com/share/v/19nUWevD1J/?mibextid=wwXIfr
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे ) रोहित पवार यांनी देखील फेसबुकवर सत्यमेवजयते! अशी पोस्ट केली आहे.