चिपी विमानतळ उद्घाटनास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निमंत्रण देण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत म्हणाले...

Update: 2021-09-27 14:25 GMT

मुंबई :  केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जोतिदित्य शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग येथील विमानतळाचं उद्घाटन होईल. आज या संदर्भात पाहणी करून आढावा घेतला. हा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम नाही फक्त निमंत्रितांसाठी असं सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो लोकांच्या उपस्थित जाहीर कार्यक्रम करता येणार नाही. कोरोना पूर्णतः गेलेला नाही त्यामुळे निमंत्रितांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं जाणार का? यावर बोलताना प्रोटोकॉल प्रमाणे सर्वांना निमंत्रण मिळेल, केंद्रीय मंत्री येतील, राज्यातील मंत्री येतील चांगल्या प्रकारे विमानतळ सुरू व्हावा हाच प्रयत्न आहे.

सोबतच या विमानतळावर एकच नाही तर चार ते पाच विमान यावी आणि सिंधुदुर्गाचं विमानतळ जागतीक दर्जाचं व्हावं हाच आमचा प्रयत्न आहे असं सामंत यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे जास्तीत जास्त विमान आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.असं ते म्हणाले, त्याचबरोबर चिपीला येणाऱ्या रस्त्याची कामं पावसामुळे थांबली आहेत,त्यांच्या वर्क ऑर्डर निघालेल्या आहेत पाऊस थांबला की रस्त्याची कामं होतील.असे ते म्हणाले.

दरम्यान या लोकार्पण सोहळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सुरेश प्रभू, खासदार, आमदार यांना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रण दिले जाणार असून, 9 ऑक्टोबरला उद्घाटन होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे. याठिकाणी पायाभूत सुविधांवर अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितलं आहे.

Tags:    

Similar News