संभाजी नगरात पोलिसांचा लाठीचार्ज; अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, काय आहे नक्की प्रकरण ? वाचा

Update: 2024-02-21 07:51 GMT

छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीसांकडून लाठीचार्ज करत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असल्याची घटना घडली आहे. शहरातील मुकूंदवाडी रेल्वे परिसरात काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले होते त्यामूळे तेथील नागरीकांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती. या परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे दिसून आल्याने महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव पथकासह या परिसरात कारवाई करण्यासाठी धडक मोहीम राबवण्यात आली.

मात्र यावेळी परिसरातील नागरीकांनी अतिक्रमण हटाव पथक आणि पोलीसांवर अचानक दगडफेक केली. त्यामूळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला. त्याचबरोबर पोलीसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या देखील फोडल्या. त्यानंतर लगेचच जेसीबीच्या माध्यामातून सदरील परिसरातील अतिक्रमण उध्वस्त करण्यात असून सदरील घटनेचे गांभीर्य पाहता जिल्ह्यातीन वरीष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

महिला आंदोलक प्रशासनाविरोधात आक्रमक

सदरील परिसरात मोठ्या संख्येने महिला जमा झाल्या. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी महिलांनी आंदोलन केले. आंदोलना दरम्यान याठिकाणी महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान परिसरातीन काही नागरीकांनी अचानकपणे अतिक्रमण हटाव पथकावर दगडफेक सुरू केल्यामुळे पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःचा जीव वाचवत तिथून पळ काढला.

Tags:    

Similar News