मोदींचं राजकीय भाषण PMO हँडल वरून ट्वीट लोकांनी मोदींना झोडलं

Update: 2021-12-08 08:15 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) नेहमीच कँपेन मोड वर असतात. प्रचार करत असताना ते राजकीय मर्यादांचं पालन करत नाहीत असा त्यांच्यावर नेहमीच आरोप होत असतो. उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा अधिकृत प्रचार सुरू झालेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे. अशाच एका सभे दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांना नेटकरी चांगलंच झोडपत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली अशी टिका त्यांच्यावर केली जात आहे.






 


 


उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh ) मधील प्रचारकी सभे दरम्यान नरेंद्र मोदी यांनी लालटोपी वाल्यांना अतिरेक्यांच्या संरक्षणासाठी सत्ता पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणजेच PMO च्या अधिकृत ट्वीटर आणि फेसबुक अकाऊंट वरून जारी करण्यात आलं. PMO चे सोशल मिडिया अकाऊंट जगभरातील डिप्लोमॅट, राष्ट्राध्यक्ष भारताची अधिकृत भूमिका म्हणून फॉलो करत असतात. अशा हँडल वरून नरेंद्र मोदी सातत्याने राजकीय विरोधकांवर बेछूट आरोप करत असतात. भारतातील राजकीय पक्षांना अतिरेक्यांना ( terrorist ) मदत करण्यासाठी सत्ता पाहिजे हा आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे, या आरोपामुळे भारतीय भूमीचा अतिरेक्यांना संरक्षण देण्यासाठी वापर केला जातो या चीन आणि पाकिस्तानच्या आरोपाला ही बळकटी मिळण्याची शक्यता आहे.




 



 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मिडीयावर कमेंटचा पाऊस पडला आहे. नरेंद्र मोदींनी जबाबदारीने बोललं पाहिजे, त्याचप्रमाणे PMO च्या सोशल मिडिया अकाऊंट चा दुरूपयोग टाळला पाहिजे अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News