शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन

Update: 2022-01-24 11:34 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानंतर देशभरातून विविध नेत्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन केले आहेत. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करुन शरद पवार यांची चौकशी केली आहे. शरद पवार यांनी सोमवारी दुपारी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट केले होते. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी काळजी कऱण्यासारखे काही नाही" असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहोत, पण संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वतःची टेस्ट करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.


या वृत्तानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन केला. याची माहिती शरद पवार यांनी ट्विटरवरुन दिली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन माझ्या प्रकृतीची चौकशी केली, त्यांचा मी खूप आभारी आहे" असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:    

Similar News